“हिंदू-मुसलमान शिवाय भाजपकडे….” ; संजय राऊतांचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात १० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे.
या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘भाजपला हिंदुत्वाशी घेणेदेणे नसून हिंदू-मुसलमानांत सदैव झगडा, त्यातून तणाव आणि अस्थिरता, त्याच तणावात हिंदू भावनांना हात घालून निवडणुका जिंकायच्या यापलीकडे यांच्या हिंदुत्वाची मजल नाही. त्याचे ताजे रटरटीत उदाहरण म्हणजे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहारी जेवणावरून भाजपच्या विद्यार्थी संघटनेने केलेली हिंसा व राडा.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या काळात ‘हिजाब’ वाद निर्माण केला गेला व हिंदू भावनांना हात घातला. हिजाब प्रकरणातील एक सत्य मान्य करावेच लागेल की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गणवेश ठरलेला असतो व तो नियम पाळायलाच हवा. धार्मिक तसेच राजकीय मुद्दे शाळा-कॉलेजात नेता कामा नयेत, पण हे वाद उकरून काढायचे काम सध्या भाजपपुरस्कृत नवहिंदुत्ववादी करीत आहेत. हिजाबपाठोपाठ आता मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराचे प्रकरण समोर आले आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या परिसरात मुसलमानांची दुकाने लावू द्यायची नाहीत, त्यांना व्यवसाय करू द्यायचा नाही अशी मोहीम आता भाजपच्या नवहिंदुत्ववाद्यांकडून राबवली जात आहे. कर्नाटकात भविष्यात निवडणुका आहेत. त्याची तयारी ही अशा पद्धतीने सुरू झाली आहे. हिंदू-मुसलमानशिवाय भाजपकडे दुसरा कार्यक्रम नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..