तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींना 24 तासांचा अल्टीमेटम , अन्यथा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी शेतकरी आणि शेतीच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे.
लवकरात लवकर नवीन कृषी धोरण आणा अन्यथा आम्ही तुम्हाला सत्तेतून काढून टाकू असा इशारा त्यांनी केंद्राला दिला आहे. शेतकऱ्यांना गंगेत ढकलण्याइतके आम्ही दुबळे नाही, असेदेखील केसीआर म्हणाले. धान खरेदीबाबत तेलंगणाच्या मागणीला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री राव यांनी केंद्राला 24 तासांचा अवधी दिला असून, तसे न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे ते म्हणाले. तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून नवी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांसोबत आंदोलन करताना त्यांनी केंद्राला वरील इशारा दिला आहे.

सीएम राव म्हणाले की, तेलंगाणातील शेतकरी (Farmer) भीक मागत नाहीत तर हक्क मागत असून, लवकरात लवकर नवीन कृषी धोरण बनवा अन्यथा केंद्रातील सरकारला काढून टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना साथ न देणाऱ्या पंतप्रधानांना काहीतरी वाटले पाहिजे. “मोदींमध्ये (Narendra Modi) हिंमत असेल तर, त्यांनी मला अटक करावी असे म्हणत, जो कोणी त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडी (CBI & ED) लावली जाते. मात्र, आपण पंतप्रधान आणि केंद्रीय अन्न मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना हात जोडून सांगतो की, कृपया आमचे अन्नधान्य खरेदी करा. मी तुम्हाला 24 तास देतो, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे. हे षड्यंत्र करणारे सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….