देशात लवकरच रामराज्य येईल ; राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक, 10 एप्रिल :- ‘रामाचे मंदिर लवकरच अयोध्येत उभारले जाणारच आहे. पण लवकरात लवकर देशात रामराज्य येणार आहे, याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली आहे’ असं वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.
रामनवमीच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थितीत होते. ‘याठिकाणी मी प्रत्येक वेळेस येऊ शकणार नाही पण आपण तरी इथे दररोज दर्शन घ्या. श्रीलंका जिंकून त्यांना परत केली, किती मोठी गोष्ट.
श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढी आयुष्यात प्रगती होईल. श्रीलंकेला जिंकल्यानंतर रामाने देश परत केला होता. रामांचा हा मोठेपणा आहे.
ते मर्यादा पुरषोत्तम आहे. रामाचे चरित्र जितके वाचाल तितके तुमचे आयुष्य आणखी सुकर होईल, असं यावेळी राज्यपाल म्हणाले.
तसंच, महात्मा गांधी सुद्धा ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीता राम’ म्हणत होते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात रामाचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मग आपण सामन्य कार्यकर्ते असो, सामन्य व्यक्ती असो किंवा राजकीय व्यक्ती असो सर्वांनी रामाचे आदर्श ठेवले पाहिजे’ असं आवाहनही राज्यपालांनी केलं.
‘रामाचे मंदिर लवकरच अयोध्येत उभारले जाणारच आहे. पण लवकरात लवकर देशात रामराज्य येणार आहे, याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली आहे’ असंही राज्यपाल म्हणाले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….