“पवार कुटुंबांनं महाराष्ट्र विकत घेतलं आहे का…?” ; निलेश राणेंचा खोचक सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर राज्यात जोरदार वाद पेटला आहे.
महाविकास आघाडीतील मंत्री आणि भाजप नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
एकही काच फुटली नाही किंवा घराचं नुकसान झालं नाही तरी राज्याचे गृहमंत्री आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पवार साहेबांच्या घरी पोहोचले. पोलीस अधिकारी घरात जाऊन तपासा बद्दल माहिती देण्यासाठी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला विकत घेतले आहे का?, असा सवाल राणेंनी केला आहे.
पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?, असं देखील वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे. परिणामी राज्यात पवारांवरील हल्ल्यानंतर राजकीय वाद वाढला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामागं कोण होतं याचा शोध मुंबई पोलीस घेत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. पण काही भाजप नेत्यांनी पवारांवर टीकेची झोड कायम ठेवली आहे.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….