या जन्मीच कर्म व याच जन्मात फेडावं ; उदयनराजेंच्या शरद पवारांना टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या ४ महिन्यापासून सुरूय. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला.
एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणांना देखील याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. शरद पवारांच्या घरावर झालेल्या या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. पोलिसांनी आता या प्रकरणात कारवाईला सुरुवात केलीय. या प्रकरणानंतर पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केलीय.
शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. ‘या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिलीय. या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावलाय.
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री काळात चांगले काम केले. तेव्हा शिवसेनाहीसोबत होती. आज जे सत्तेत आहेत. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलंय. त्यांचा विसर सरकारला पडलाय. नाराजी दूर करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. विकास थांबला आहे. त्याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. सत्ता कोणाचीही असो लोकांच्या विकासावर गदा येता कामा नये. लोकशाहीच्या प्रक्रियेत निवडणुका अटळ आहेत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या प्रगतीला उत्तर देणारी असेल, असंही उदयनराजेंनी म्हंटलंय.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….