“मीही गृहमंत्री होतो” ; गृहमंत्र्यांला कोण देतंय १०० कोटी रुपये…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्री छगन भुजबळ पंढरपूरला आले होते.
यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी समितीच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार केला. यावेळी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे भुजबळ म्हणाले, ज्या वाझेला अटक झाली आहे तो चांदीवाल आयोगासमोर सांगतो की, अनिल देशमुख मला बोलले नाहीत. मी तसं लांबून ऐकलं. याला काय अर्थ आहे हो? याचा अर्थ काही करून त्यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचे आणि असे मोठे १०० कोटी, ५०० कोटी, १००० कोटी असे आरोप ठेवले की, मग ‘ईडी’ची केस मजबूत करायची आणि जास्तीतजास्त तुरुंगात ठेवायचं हा ‘ईडी’चा प्रकार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
गेल्या ५० वर्षांत असे पाहिले नाही
कोणी वसूल केले पैसे? कुठे गेले पैसे? मिळाले का तुम्हाला? पण फक्त सांगायचं की, हा असं बोलला असं आम्ही ऐकायचं आणि यावर खटला उभा राहतो, असे आपण गेल्या ५० वर्षांत कधी पाहिले नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….