पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार आहे. याबाबत आज एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती.
पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएकडून 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र, आता लगेचच 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.
नीटची परीक्षा रद्द का झाली?
राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी ‘गेस पेपर’चे वितरण
‘गेस पेपर’मध्ये एकूण 410 प्रश्न होते
‘गेस पेपर’मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
नीटच्या परिक्षेबाबत विविध प्रश्नांची उत्तर- (NEET UG 2026 Re-Exam)
1. NEET UG Registration : पुन्हा अर्ज करावा लागणार का?
नाही. विद्यार्थ्यांना नव्याने Registration करण्याची आवश्यकता नाही. NTA कडे आधीपासून उपलब्ध असलेला डेटा पुढील प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.
2. NEET UG Exam Fee : पुन्हा फी भरावी लागणार का?
नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फी वैध राहील. अतिरिक्त फी भरण्याची गरज नाही.
3. NEET Fee Refund : आधी भरलेली फी परत मिळणार का?
होय. NTA ने स्पष्ट केले आहे की आधी भरलेली परीक्षा फी नियमांनुसार विद्यार्थ्यांना परत केली जाईल आणि पुनर्परीक्षा NTA स्वतःच्या संसाधनांतून आयोजित करेल.
4. NEET Admit Card : नवीन Admit Card जारी होणार का?
होय. नवीन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार NTA पुन्हा Admit Card जारी करेल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. त्याची पूर्वसूचना देण्यात येईल.
5. NEET Exam Centre Choice : पुन्हा परीक्षा केंद्र निवडावे लागेल का?
नाही. विद्यार्थ्यांनी आधी निवडलेले केंद्रांचे पर्याय NTA च्या नोंदीत कायम राहतील.
6. NEET Exam Centre Allocation : तेच परीक्षा केंद्र मिळेल का?
याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. परिस्थितीनुसार NTA केंद्रांमध्ये बदल करू शकते.
7. NEET New Exam Date : NEET ची नवीन तारीख कधी जाहीर होणार?
सध्या नवीन परीक्षा तारीख जाहीर झालेली नाही. NTA लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे.
8. NEET Official Schedule : वेळापत्रक कुठे पाहता येईल?
परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक आणि सर्व अपडेट्स NTA Official Website वर उपलब्ध होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..