स्थानिक निवडणुकीची वार्ड फेररचना करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला पत्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे वॉर्ड फेररचनेचे काम सुरू करण्यासाठीचा ठराव विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आला होता.
आता या ठरावानुसारच वॉर्ड फेररचना सुरू करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे वॉर्ड फेररचनेचे काम सुरू करण्यासाठीचा ठराव विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आला होता. आता या ठरावानुसारच वॉर्ड फेररचना सुरू करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळात पारित झालेल्या ठरावानुसार सरकारने वॉर्ड फेररचनांचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. आयोगाने नव्या रचनांना मान्यता दिल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांणधील निवडणुका पार पडतील. तथापि त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशानेच आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
205 नगर परिषदा, 1,930 ग्रामपंचायत, 16 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 284 पंचायत समित्या यांच्या निवडणुका खोळंबलेल्या आहेत.
वॉर्ड फेररचनेच्या कामाबाबातचे पत्र पाठविणे हा एक प्रक्रियेचा भाग असल्याचाही दावा केला जात आहे. तथापि, फेरचनेचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांना डोळ्यांसमोर ठेवून करणे आवश्यक असल्याची गरजही व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगालाही त्याच दृष्टीने तयारी करावी लागणार आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…