मोठी बातमी ; इकडं केजरीवाल गुजरातमधून परतलेच अन् तिकडं भाजपात सामिल झाले “आप”चे 300 कार्यकर्ते….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील सुमारे 150 नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
एवढेच नाही, तर काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. काँग्रेसच्या अनेक कार्यकरत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवस आधीच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून परतले आहेत. असे असतानाच एवढ्या मोठ्या संख्येने आप नेत्यांनी पक्ष राम-राम ठोकला आहे. मार्चमध्येच ‘आप’च्या शेकडो नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
गुजरात भाजपचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला म्हणाले, “दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे मुख्यमंत्री घरीही पोहोचले नसतील किंवा त्यांचे जेवणही झाले नसेल आणि त्यांच्या पक्षातील अनेक लोक भाजपमध्ये सामील झाले. यावरून ते गुजरातच्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांच्या गुजरात दौऱ्याला काही अर्थ नाही. भाजपसोबत गुजरातच्या जनतेचा आशीर्वाद काय आहे. पंजाबमध्ये आप सरकारच्या अवघ्या पाच दिवसांत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, असेही ते म्हणाले.”
नव्या नेत्यांचे पक्षात स्वागत करताना वाघेला म्हणाले, ‘आज आपण ‘आप’ आणि काँग्रेस सोडून भाजपत आला आहात. ते म्हणतील, की तुमचा काही उपयोग नव्हता. पण, मी सांगू इच्छितो की गुजरातच्या विकासासाठी आपण अत्यंत महत्त्वाचे आहात आणि भाजपमध्ये आपले स्वागत आहे. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ भाजपचे सरकार आहे. कारण जनतेचा आमच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.’
महत्वाचे म्हणजे, दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आलेले केजरीवाल आणि मान रविवारी गुजरातमधून परतले आणि सोमवारीच आपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्ते गांधीनगरच्या कमलम येथील कार्यालयात भाजपमध्ये सामील झाले.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….