राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीदवरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनुमान चालीसा लावला.
पुण्यातील माजीद अमीन शेख वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी राजीनामा दिला
मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. /e कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे. माजिद शेख यांच्यानंतरर अनेक मनसे मुस्लिम कार्यकर्ते राजनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल, असे राज ठाकरे म्हणाले.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..