पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाकडून सासऱ्याचा खून…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- प्रेमविवाह केल्यानंतर पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तिला माझ्यासोबत नांदायला का पाठवत नाही, याचा राग मनात धरुन जावयाने वृद्ध सासऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केला.
ही घटना शुक्रवारी सकाळी बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात उघडकीस आली. विश्राम बिसन वयले (वय ५५, रा. टिटवा ता. चांदूररेल्वे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, विश्राम वयले यांच्या मुलीने राजेश सुधाकर शिवणकर ( वय २९) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. राजेशचे वागणे सुरुवातीचे काही दिवस चांगले होते. परंतु, नंतर तो व्यसनाच्या आहारी गेला. पत्नीवर संशय घेवून तिला मारहाण करू लागला. या जाचाला कंटाळून राजेशची पत्नी वडील विश्राम वयले यांच्या घरी रहायला आली. यानंतर राजेश पत्नीला सारखे- सारखे नांदायला येण्यास तगादा लावत होता. या घटनेमुळे विश्राम वयले यांनी मुलीला पतीकडे जाण्यास परवानगी दिलेली नव्हती.
विश्राम वयले हे बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखुटा शिवारातील आशुतोष गुल्हाने यांच्या शेतावर कामाला होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे विश्राम वयले शेतावर कामावर गेले होते. ते रात्री उशीरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे विश्रामचा मुलगा शंकर त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला. तेव्हा विश्राम मृतावस्थेत आढळून आला. यावेळी डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचे दिसत होते. यानंतर शंकरने याबाबतची तक्रार बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली.
यावेळी जावई राजेश शिवणकर यानेच वडिलांचा खून केला असे त्याने तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी ठाणेदार रवींद्र जेधे यांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून राजेशला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली. या ठिकाणी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी आदी करीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….