वाघनाथ जवळ भरधाव व्हॅग्नर पुलावर आदळली ; १ वर्षीय बाळाचा मृत्यू ; दोघांची प्रकृती चिंताजनक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
माहूर वरून महागाव च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव चारचाकी व्हॅग्नर पुलावर आदळल्याने एक वर्षीय नवजात बाळ जागीच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी पावणेचार च्या सुमारास महागाव तालुक्यातील वाघनाथ जवळ घडली आहे. ज्ञानेश्वरी उजैनकर (अं.१ वर्षे) असे मृतक बाळाचे नाव असुन चंद्रकांत उज्जैनकर (५२) , भाग्यश्री चंद्रकांत उज्जैनकर वय (३८) आरती उज्जैनकर ( ४२) सुरेखा उज्जैनकर (६०) सार्थक उज्जैनकर( ०६)
सर्व राहणार जालना असे गंभीर जखमीचे नावे आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
जालना येथील उज्जैनकर कुटुंब माहूर येथील दर्शन आटोपून व्हॅग्नर क्रमांक एमएच ११ वाय २३३७ गाडीने परत गावाकडे निघाले होते.अश्यातच वाघनाथ या गावाजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या अँपे ऑटोला वाचविण्याच्या प्रयत्नात व्हॅग्नर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.अनियंत्रित झालेली व्हॅग्नर रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर आदळली.या घटनेत एक वर्षीय मुलगी जागीच गतप्राण झाली. अपघातानंतर जखमींना तात्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र सदर बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर जखामितील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…