नाशिकमध्ये “पवन एक्स्प्रेस” चे १९ पैकी १२ डब्बे रुळावरुन घसरले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे १९ पैकी १२ डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे.
देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच वैद्यकीय पथक देखील घटनास्थळावर पोहोचलं असून बचाव कार्य सुरू आहे.

रेल्वे क्रमांक ११०६१ पवन एक्स्प्रेस ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून (LTT) जयनगर (बिहार) येथे जात होती. दरम्यान नाशिक जवळील देवळाली येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांच्या सुमारास रेल्वेचे काही डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 (नाशिक) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तर मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL: 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…