महाराष्ट्राला बदनाम करु नका , आम्ही सर्वजण एकत्र :- मुख्यमंत्री ठाकरे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये मतभेद असल्याचं वातावरण तयार केलं जातं सरकारमध्ये अजिबात मतभेद नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
आज जीएसटी भवनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली यावेळी ते बोलतं होते. गेले काही दिवस राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. यावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडले.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाच राज्य ठरलं आहे. ही अभिमानाची बाब आहे. जीएसटी विभाग देशाचा आणि राज्याचा मोठा आधार आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट असल्याचं वातावरण निर्माण केले जात आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.
जीएसटी भवनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी मान्यवर उपस्थित होते

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….