तुरुंगात जाण्यासाठी परबांनी लवकरच बॅग भरावी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- तुरुंगात जाण्याचा पुढील नंबर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा असून, त्यांनी लवकर बॅग भरावी असा, सूचक आणि खोचक सल्ला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली असून, त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आले आहे. त्यामुळे आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा आला आहे, असे सोमय्या म्हणाले. दरम्यान, दापोलीतील रिसॉर्ट संदर्भात आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली असून, त्यात सर्व पुरावे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हसन मुश्रीफांकडे 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती :-
हसन मुश्रीफ परिवाराकडे शंभर कोटी पेक्षा जास्त बेनामी संपत्ती आहे, त्याची आज न्यायालयीन सुनावणी आहे. घोटाळेबाजांना ठाकरे सरकार पाठीशी घालतय. तसेच सोमय्या यांनी अनिल परब व सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला. हसन मुश्रीफ यांच्या वर फौजदारी कारवाई मागणी केली. तसेच त्यांनी आपल्याकडे अनेक पुरावे पूरावे असल्याचा दावा केला.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..