पुसद कॉग्रेस तर्फे महागाई विरोधात आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- केंद्रातील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून जिवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून सर्व सामान्य जनतेची लूट करीत आहेत . या महागाईने सर्वसामान्य जनतेला जिवन जगणे कठिण केले आहे . या विरोधात काँग्रेस अध्यक्षा मा . सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात या जिवघेण्या महागाई विरोधात सपूर्ण देशात काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येत आहे . संपूर्ण आठवडा भर वेगवेगळ्या टप्यात आंदोलन करण्यात येत असून आज दिनांक ०१/०४/२०२२ पासून या आंदोलनाची सुरवात झालेली आहे . शिवाजी चौक पुसद येथे कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ . मोहम्मद नदीम व अॅड . सचिन नाईक यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्तानी सह केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून व डफडे वाजवून आंदोलन केले आहे . डिझेल पेट्रोल व एलपीजी गॅस दरवाढीविरोधात मोटारसाईकलवर व गॅस सिलेंडरवर हार टाकून प्रतिकात्मक स्वरूपात आंदोलन करण्यात आले . कार्यकर्त्यांना व उपस्थित जनतेला डॉ . मो . नदीम व अॅड . नाईक यांनी संबोधित केले . पाच राज्याच्या निकालानंतर मागील आठवडयापासून डिझेल , पेट्रोल व गॅस च्या दरात दररोज वाढ होत चालली आहे त्यामूळे याचा परिणाम जिवनाश्यक वस्तूच्या किंमतीत मोठी वाढ होत चालली आहे . केंद्रातील मोदी सरकार जनतेची विश्वासघात करित आहे . अश्या विश्वासघाती सरकार धडा शिकविला पाहिजे असे त्यांनी आपल्या संबोधनात म्हटले आहे . या आंदोलनात सैयद इस्ताक , जिया शेख , सैयद अन्वर , बाबा उंटवाल , संध्याताई कदम , अमजद बिल्डर , नैनेखान पठाण , संतोष अंभोरे , समद कुरेशी , सौ . वर्षाताई वैद्य , सैयद जानी , अभिलाष खैरमोडे , शेख नजीर , सौ . सुमन ताई आमले , फिरोजखान , शम्मूभाई मिस्त्री , शेख महमूद शेख आसिफ , सौ . वाहिद्द्दिनूसा , बेगम आप्पा , सौ . शबानाबि , पुललिक टारफे , जमिल गौरी , मो . यूनुस , मो . जुनेद , गोपाल राठोड , विठ्ठल धूपारते , विजय उबाळे , रोहन कांबळे , शाकिब शहा या प्रमुख कार्यकर्तासह , युवक कॉग्रेस , महिला कॉग्रेस , सेवादल व अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारीसह इतर शेकडो कार्यकर्त उपस्थित होते .

रखरखत्या उन्हात शिवाजी चौकात मोठया संख्येत कार्यकर्त उपस्थित होते कार्यकर्तानी विश्वासघाती मोदी सरकारच्या विरोधात जोरजोराने घोषणाबाजी करून केंद्रसरकारचा निषेध व्यक्त केला . कमी करा , कमी करा महागाई कमी करा . केंद्र शासित भाजप सरकारचा निषेध असो , विश्वासघाती मोदी सरकार हाय हाय या घोषणानी परिसर दनानून गेला होता . जनतेचे लक्ष वेधन्यासाठी डफडे वाजवून आंदोलन करण्यात आले . आंदोलन यशस्वी करण्याकरिता सैयद इस्ताक , जिया शेख इत्यादी कार्यकर्तानी परिश्रम घेतले . रखरखत्या उन्हात कार्यकर्ता उपस्थित झाले त्यासर्वाचे अशोक बाबा उंटवाल यांनी आभार व्यक्त केले .

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….