तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर तृतीय पंथीयांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 मार्च :- ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत २७ मार्च ते २ एप्रील या कालावधीत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबीराचा लाभ घेवून तृतीयपंथीयांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत
निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच, २१ वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तिच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या मोहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली होती.
जिल्ह्यातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तहसिल कार्यालयातील शिबीरासोबतच जिल्ह्यामध्ये ज्या भागात तृतीय पंथीयांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, अशा ठिकाणी मतदार नोंदणीची शिबिरे आयोजीत केली जाणार आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तिंनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…