वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना पंचायत समिती स्तरावर सादरीकरणाचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 मार्च :- महाराष्ट्र शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दरमहा मानधन देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सन 2019-20, 2020-21 व 2021-22 मधील कलावंताची मानधनाकरिता निवड करण्याकरिता जिल्हास्तरीय निवड समितीची सभा 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने खऱ्या व गरजू कलावंताची मानधनासाठी निवड व्हावी याकरिता तालुकास्तरीय छाननी समिती गठीत करण्यात आली असून संबंधीत पात्र अर्जदारांचे प्रत्यक्ष सादरीकरण आयोजित करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी यवतमाळ व कळंब तालुक्यातील कलाकारांचे सादरीकरण पंचायत समिती सभागृह यवतमाळ येथे होईल. 6 एप्रिल रोजी राळेगावचे राळेगाव पंचायत समिती येथे तसेच दारव्हा, दिग्रस व आर्णी येथील सादरीकरण दिग्रस पंचायत समिती येथे हाईल, 7 एप्रिल रोजी पुसद व महागाव येथील पंचायत समिती सभागृहात सादरीकरण होईल. तसेच वणी, मारेगाव व झरी जामणी येथील सादरीकरण पंचायत समिती वणी येथे होईल. 8 एप्रिल रोजी उमरखेड येथे सादरीकरण होईल. 13 एप्रिल रोजी नेर व बाभुळगाव चे सादरीकरण नेर येथे होईल. 19 एप्रिल रोजी घाटंजी व पांढरकवडा येथील सादरीकरण पांढरकवडा पंचायत समिती सभागृहात होईल.
पात्र अर्जदार कलाकारांनी दिलेल्या तारखेवर सकाळी 11 वाजता संबंधीत तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात मुळ संचिकेसह सादरीकरणासाठी उपस्थित राहावे. पात्र अर्जदारांची यादी संबंधीत पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…