कामगार संघटनाच्या देशव्यापी आज आणि उद्या संप ; बँक बंद राहणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, जनताविरोधी धोरणांविरोधात कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. 28 व 29 मार्च रोजी दोन दिवस चालणाऱया या संपामध्ये घरकामगार, विडी कामगारांपासून ते सरकारी कर्मचाऱयांबरोबरच बँक कर्मचारीही सहभागी होणार आहेत.
यामुळे आधीच शनिवार आणि रविवार बंद असलेल्या बँका सोमवारी आणि मंगळवारीही बंद राहणार असून याचा थेट परिणाम सर्वच आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.
पेंद्र सरकारने केलेले चार कामगार कायदे, सरकारी उद्योगांच्या खासगीकरणामुळे देशातील महागाई, बेरोजगारी वाढेल. त्याचप्रमाणे कामगार हक्कांची पायमल्ली होईल, असा दावा या कामगार संघटनांनी केला आहे. नियोजन कामगार, घर कामगार, फेरीवाले, विडी कामगार, बांधकाम कामगार, कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर, बँका, विमा या क्षेत्रांतील कामगार संघटनाही या संपात सहभागी झाल्या आहेत.
सेव्ह पिपल, सेव्ह नेशन
ईपीएफचा व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर करण्यात आला असून पेट्रोल, एलपीजी, केरोसीन, सीएनजीच्या दरातही अचानक वाढ करण्यात आली आहे, या सर्वांचा निषेध करताना कामगार संघटनांनी ‘सेव्ह पिपल, सेव्ह नेशन’ या घोषणेखाली संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
वीज कामगारांना मेस्माचा इशारा
देशातील संपूर्ण वीज क्षेत्राचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने विद्युत संशोधन विधेयक आणले आहे, राज्यातील जलविद्युत केंद्रांचे खासगीकरण, स्वतंत्र कृषी वीज पंपनी तयार करणे, महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील एकतर्फी बदली धोरण याविरोधात वीज कामगार आक्रमक झाले असून उद्या सोमवार आणि मंगळवार म्हणजे 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समितीने घेतला आहे. मात्र राज्य सरकारने वीज सेवा अत्यावश्यक गटात मोडत असल्याने कामगारांनी संप केल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
केंद्राकडून वीज कंपन्यांना हायअलर्ट
देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पेंद्रीय ऊर्जा विभागाने राज्यातील वीज कंपन्यांसाठी हायअलर्ट जारी केला आहे. त्यानुसार संपकाळात दोन दिवस नॅशनल ग्रीडला अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून उपाययोजन करण्यास बजावले आहे. तसेच राज्य भार प्रेषण केंद्रांनीही वीज निर्मिती आणि वीज वितरण पंपन्यांशी समन्वय साधत चोख नियोजन करावे असेही स्पष्ट केले आहे.
एटीएममध्ये खडखडाट
सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने एटीएममध्ये पैसे पोहोचणार नाहीत. एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यास नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. संपाबाबत बोलताना स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले की, नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कोटय़वधींची उलाढाल ठप्प होईल. एटीएममध्ये पैसा नसल्याने नागरिकांना अडचणी येऊ शकतात. यासाठी आवश्यक ती व्यवस्था यापूर्वीच करण्यात आल्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…