पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज पासून कोकण दौऱ्यावर ; तीन दिवसीय झंझावाती दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा 28 ते 30 मार्चदरम्यान कोकणात झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱयात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यात शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत
सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण, गणपतीपुळे नळपाणी योजनेचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरे मालवण येथे बंदर जेटीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर फिश ऍक्वेरियमसंदर्भात चर्चा होणार आहे. दुपारी 12 वाजता देवगड नगर परिषदअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर साडेतीन वाजता वायंगणी येथील कासवजत्रा कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. 4 वाजून 15 मिनिटांनी आरवली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संलग्न पोमेंतो ग्रूपच्या पंचतारांकित हॉटेलची पाहणी ते करणार आहेत.
सायंकाळी 5 वाजता वेंगुर्ला शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन, पाणबुडी प्रकल्प व जलपर्यटन विकसित करण्यासाठी प्रस्तावित वेंगुर्ला जेटीची पाहणी, ऑब्झर्वेशन डेकचे उद्घाटन, फिशिंग व्हिलेज महोत्सवाचे उद्घाटन, फळ संशोधन केंद्र अंतर्गत कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्राची पाहणी ते करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह वेंगुर्ला येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
माणगाव येथे शिवसेना मेळाव्यात मार्गदर्शन करणार
30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरे वशिष्ठी नदी गाळउपशाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. माणगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत.
गणपतीपुळे नळपाणी योजनेचे भूमिपूजन
29 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता आदित्य ठाकरे राजापूर येथील धुतपापेश्वर मंदिराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 11 वाजून 45 मिनिटांनी लांजा तालुक्यातील अजिंक्य सभागृहात शिवसेना पदाधिकाऱयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजता गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेणार आहेत. सवातीन वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गणपतीपुळे नळपाणी योजनेचे भूमिपूजन होणार आहे. सवाचार वाजता ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोट क्लबची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 6 वाजता गुहागर येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…