बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पटना :- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. नितीश कुमार यांचा ताफा बख्तियापूर मार्केटमधून जात होता.
त्यावेळी काही नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी थांबवले होते.
नागरिकांना भेटल्यानंतर नितीश कुमार यांनी आपल्या नियोजित रॅलीला संबोधन्यासाठी व्यासपीठावर गेले. यावेळी पाठीमागून एका व्यक्तीनं नितीश कुमार यांना बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. परिणामी सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
नितीश कुमारांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. नितीश कुमार यांनी देखील यावेळी तत्परता दाखवत लागलीच बाजूला झाल्यानं अनर्थ टळला आहे. पोलीस या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, मुख्यमत्र्यांना असणारा मोठा सुरक्षा घेरा या व्यक्तीनं अगदी सहजपणे पार केल्यानं राजकीय स्तरातून नाराजीचा सुर उमटत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…