दिल्ली , पंजाब नंतर आता आम आदमी पक्षाची नजर “या” राज्यांवर ; लवकरच “आप” ची मोठी कार्यकर्ता परिषद घेणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाची नजर आता राजस्थानवर असणार आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ऐतिहासिक विजयानंतर आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे.
त्यामुळे आता राजस्थानमध्ये ‘आप’ने संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. ‘आप’ने रविवारी राजस्थानमध्ये पहिली मोठी कार्यकर्ता परिषद घेतली.
पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये आपला संधी दिसत आहे. राजधानी जयपूरमध्ये झालेल्या या आपच्या परिषदेत राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी 2023 मध्ये राजस्थानमध्ये आप सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, येथे सर्व चांगल्या लोकांचे स्वागत आहे. आम्हाला आता थांबण्याची किंवा खचून जाण्याची गरज नाही. 2023 मध्ये राजस्थान जिंकूनच मरायचे आहे. भाजप, काँग्रेस आणि बसपामध्येही चांगल्या लोकांची कमतरता नाही. तेथे अनेक नेते नाराज आहेत. चांगल्या नेत्यांसाठी आम आदमी पार्टीचे दरवाजे नेहमीच खुले असतात. पंजाबनंतर आता आम आदमी पार्टीचा पुढचा मुक्काम राजस्थान आहे.’
आम आदमी पक्षाने दिल्लीला लागून असलेल्या राज्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. हरियाणा, राजस्थान आणि हिमाचलमध्ये पक्षाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा आप नेत्यांनी केला.
राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाला शून्यातून प्रवास सुरू करायचा असून त्यासाठी वेळ कमी आहे. राज्यात 18 महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…