“मोदी सरकारच्या कार्यकाळात दलितांवर अत्याचार वाढले” ; आठवलेंनी संसदेत धक्कादायक माहिती दिली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेत देशाच्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. विविध मुद्द्यांवरून भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होत आहेत. अशातच दलित अत्याचाराच्या घटनांच्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी धक्कादायक माहिती दिली आहे.
2018-2020 या तीन वर्षांच्या काळात देशात दलितांवरील अत्याचारासंदर्भात तब्बल 1 लाख 38 हजार 825 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. बसपाचे खासदार हाजी फजलूर रहमान यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
भाजपशासित उत्तर प्रदेशात सर्वाधिक दलित अत्याचाराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. 2020 मध्ये तब्बल 12 हजार 714 तर एकून तीन वर्षात 36 हजार 467 अशी भयानक आकडेवारी समोर आली आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो.
दरम्यान, दलितांवरील अन्यायाच्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राची आकडेवारी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी संसदेत सर्व माहिती दिली आहे.

मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…