मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगणचे विश्वस्त डॉ आनंद नाडकर्णी यांचे निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवार १५ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाने त्यांचा मित्र परिवार, चाहतावर्ग यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मानसोपचार क्षेत्रात मोलाचं योगदान
डॉ आनंद नाडकर्णी यांनी मुंबईतून वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात एमडी पदव्युत्तर शिक्षण घेतले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात सक्रिय होते. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) आणि मुक्तांगण डी-अॅडिक्शन सेंटरचे ते संस्थापक होते. लेखक, नाटककार, कवी, संगीतकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ नाडकर्णी यांची ओळख होती.
मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीचं काम
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात डॉ आनंद नाडकर्णी यांचं अतुलनीय योगदान आहे. सोशल मीडियातूनही डॉ आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागृत करण्याचं काम केलं आहे. डॉ आनंद नाडकर्णी यांचा विविध विषयांचा व्यासंग होता. पुस्तकं, पॉडकास्ट मुलाखतींच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याचे विविधांगी कंगोरे उलगडून दाखवले. मानसिक आरोग्य संस्था – IPH (Institute for Psychological Health) च्या माध्यमातून डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याबाबत समाजाभिमुख काम केलं आहे.
मृत्यूशी झुंज अपयशी
गेल्या काही काळापासून ते आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होते. मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र मृत्यूशी त्यांची झुंज अपुरी पडली आणि वयाच्या ६८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. लेखिका वीणा गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी फेसबुकच्या माध्यमातून डॉ. नाडकर्णी यांना आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….