पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या वेगवान घडामोडी घडत असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांच्या अतिशय जवळचे मानले जाणाऱ्या सुनील शेळके यांनी मोठा दावा केला आहे.
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारी असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सुनील शेळके म्हणाले, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. 2029 ची निवडणूक रोहित पवार काँग्रेस पक्षातून बारामतीमधून लढण्याची त्यांची इच्छा आहे. रोहित पवार दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले आहेत ते काँग्रेसमध्ये जाण्यास तयार आहेत. जर मी बोलतो ते खरं नसेल तर रोहित पवारांनी पुढे येऊन सांगावं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर मी पक्ष सोडणार नाही.
रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाचं वाटोळे केलं : सुनील शेळके
पोटनिवडणुकीत देखील रोहित पवारांनीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा अशी मागणी केल्याचा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे. विलणीकरण करायचं म्हणजे कुणीतरी चर्चा करायला हवी, कोणत्या पक्षाचा कोणत्या पक्षात करायचं हे त्यांनी येऊन चर्चा करायला हवी… रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाचं वाटोळे केलं आता ते दुसऱ्याच्या पक्षात लक्ष घालत आहे. रोहित पवार यांनी त्यांचा तुतारी हा पक्ष संपवला, असे म्हणत आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?
22 आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे भारतीय जनता पक्षातून लढणार, असा सनसनाटी दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला होता. भाजपप्रवेश कधी करायचा, हे ठरणं बाकी असल्याचं रोहित पवार म्हणाले होते. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वाद सुरु असतानाच, सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल-तटकरेंची पदं वगळल्याची कारकुनी चूक काल समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवारांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहे.

महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….