बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न फडणवीस पुर्ण करतील :- आमदार नितेश राणे यांच्या दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) :- महाविकास आघाडी हे राज्यावरील संकट असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी सोमवारी (ता.२१) येथे केली. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राणे कुटूंबियांसह येथे आले होते.
त्यावेळी दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आमदार राणे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हेच नागरिकांसाठी संकट आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पूर्ण करतील, असेही त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद व औरंगाबादचे नामकरण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नशीबात नाही असेही ते म्हणाले. यावेळी तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सचिन पाटील यांच्या वतीने नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सत्कार करण्यात आला.
राणे यांचे फटाके फोडून येथे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….