मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार ; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने उद्या शिवाजी पार्क येथे शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
यासाठी आता शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती तारखेनुसार न करता तिथीनुसार करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. येत्या सोमवारी 21 मार्च रोजी होणारी शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या जल्लोषात साजरी करण्यासाठी मनसैनिक कामाला लागले आहे.
मुंबईसह राज्यात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील अश्वारुढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास महाराजांच्या पुतळ्यावर ही पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….