मोठी बातमी ; नवाब मालिकांच्या लेकीच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण शिगेला पोहोचलं.
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने (Nilofer Malik) मलिकांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. भाजप (BJP) नेत्यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबध आहेत. तसेच याबद्दलची माहिती माझ्याकडे असल्याचं नवाब मलिक या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. नवाब मलिकांच्या या जुन्या व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ पाहायला मिळत आहे.
नवाब मलिक त्यांच्या या जुन्या भाषणात भाजप नेत्यांचं बिंग फोडण्याबद्दल बोलत आहेत. माझ्या जवळ असलेला हायड्रोजन बॉम्ब फोडल्यावर, माझ्याजवळ असलेली सीडी बाहेर काढल्यावर भाजप नेत्यांची अवस्था बिकट होईल, असा दावा नवाब मलिक करताना दिसत आहेत.

दरम्यान, नवाब मलिकांना हे सत्य उघड करण्यापासून रोखण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे, असा आरोप निलोफर मलिक यांनी हा व्हिडीओ शेअर करत केला आहे. तर सत्य कुठेही जात नाही आणि आम्हीही जाणार नाही, असा विश्वास देखील निलोफर मलिक यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….