महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येवू देणार नाही :- शरद पवार यांचे निर्धार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून आटापिटा सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून दबाव आणला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली तेव्हा त्यांनी हा विश्वास या आमदारांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील तरुण आमदारांना गुरुवारी मोलाचे मार्गदर्शन केले. राज्यमंत्री आदिती तटकरे, रोहित पवार, योगेश कदम आदी आमदारांचा त्यात समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. आमदारांकडून निवडणूक निकालांबाबत प्रश्न मांडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे राहिले आणि त्यांनी हात उंचावले. हाताच्या मुठी आवळून त्यांनी घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचे सरकार येऊ देणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना दिला.
भाजपची व्यूहरचना शिकून घ्या
भाजपच्या नेत्यांकडून काही गोष्टी शिकून घ्या, असाही सल्ला शरद पवार यांनी दिला. भाजप नेते कशा प्रकारे काम करतात ते पहा. निवडणूक लढवताना भाजप किती नियोजनबद्ध व्यूहरचना आखते हे शिकून घ्या. तसेच भाजपचे नेते आपल्या कामाचे मार्केटिंग किती उत्तम प्रकारे करतात, ही देखील शिकण्यासारखी गोष्ट असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
अडीच वर्षे थांबावे लागेल – छगन भुजबळ
आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता येईल, असे कुणी म्हणत असले तरी त्यासाठी त्यांना अजून अडीच वर्षे थांबावे लागेल, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हाणला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेच त्यांनी सूचीत केले.
आगामी निवडणुकीत राज्यात भाजपाची एकहाती सत्ता येईल, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर भुजबळ म्हणाले, त्यांना तसे म्हणायला हरकत नाही, पण निवडणुकीची ती वेळ येण्यासाठीसुद्धा अडीच वर्षे थांबावे लागेल. निवडणूक येईल तेव्हा पाहू, सध्यातरी ते म्हणतात तसे चित्र राज्यात दिसत नाही. उत्तर प्रदेशात भाजपाचे पन्नासहून अधिक आमदार कमी झाले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
2024 मध्ये पुन्हा येणार – देवेंद्र फडणवीस
चार राज्यांत यश मिळाले. आता ‘मिशन महाराष्ट्र’ आहे. 2024 मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार आणणार. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पुढे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता येईल, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….