महाविकास आघाडी-एमआयएम युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- महाविकास आघाडी आणि एमआयएम एकत्र आले, तरी काह फरक पडणार नाही, सर्वांचे भाजपला हरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, पण भाजपच्या पाठिशी जनता असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जरी ते सर्व एकत्रित आले, तरी शेवटी ते सर्व एकच आहेत. भाजपला अडवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्व एकत्रित देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्व एकत्रित आले तरी महाराष्ट्रातील जनता मोदींवर विश्वास ठेवणारी आहे. भाजपलाच जनता निवडून देईल, असे ते म्हणाले.
पण शिवसेना या सर्व प्रकारात काय करणार, हे आम्हाला पाहायचे आहे. हे हरले, तर यांना ईव्हीएम दिसते, बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते. या पद्धतीच्या टीका हरल्यानंतर करत असतात. आता शिवसेना सत्तेसाठी काय करते, हे आम्हाला पाहायचे आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. आधीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वीकारलेला आहे. अजानची स्पर्धा ते घेऊ लागले आहेत. एमआयएमसोबत युती हे त्याचा परिणाम आहे का पाहू, असे ते म्हणाले.
फडणवीस नवाब मलिक यांच्यासंदर्भात बोलताना म्हणाले की, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्ती हा जेलमध्ये असताना पदावर राहणे योग्य नाही. नवाब मलिक हे संवैधानिक पदावर आहेत, ते स्टेट्युटरी पदावर नसल्याचे ते म्हणाले. तसेच फडणवीस राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजीसंदर्भात बोलताना म्हणाले की, माझी यासंदर्भात राजू शेट्टी यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मुळातच राजू शेट्टी आमच्यासोबत होते, काही कारणाने ते पलीकडे गेले. कोण आमच्यासोबत येणार कोण नाही, हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. पण जो कोणी शेतकरी नेता असेल, त्याने जर मागच्या काळात वळून पाहिले, तर जेवढे निर्णय शेतकरी हिताचे पंतप्रधान मोदींनी घेतले, तेवढे कोणी घेतले नाही. तसेच साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारन जेवढे केलं, तेवढे कोणीच केलेले नसल्यामुळे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पण अद्यापही माझी राजू शेट्टी सोबत कुठली चर्चा झालेली नसल्याचे फडणवीस म्हणाले

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..