अनाथ आणि बेघर मुलांना महाराष्ट्र सरकारकडून होळीची मोठी भेंट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र सरकारने होळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनाथ आणि बेघर मुलांना बालकल्याण योजनेमार्फत मोठी भेट दिली आहे. या मुलांना मिळणार मासिक भत्ता हा 2500 रुपये इतका करण्यात आला आहे.
अशी माहिती बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेतील कनिष्ठ सभागृहामध्ये यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग मार्फत 2021 नोव्हेंबर पासून राज्यातील अनाथ मुलांचे सर्वेक्षण करत आहेत. यामध्ये 1,266 मुले ही रस्त्यावर राहत असून 5,153 मुले कुटुंबासह रस्त्यावर राहतात.
बालकल्याण योजना अंतर्गत राज्य सरकारने बेघर आणि गरीब मुलांना मिळणारा मासिक भत्ता 425 रुपयांवरून 2,500 केला आहे. दैनंदिन गरजांसाठी या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना ‘डे केअर’ सेंटरमध्ये देखील ठेवणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
महाराष्ट्रामध्ये कोविड-19 महामार्गच्या काळात पाच वर्षाखालील 8,584 मुलांचा मृत्यू झाला आहे, यानंतर राज्य विधानसभेत साथीच्या आजारांबाबत उत्तर देत असताना यशोमती ठाकूर म्हणाल्या आर्थिकदृष्ट्या मजबूत जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत.
दरम्यान, 2014 पासून नवीन अंगणवाड्यांना कसलीही परवानगी मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे आतापर्यंतचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले असून अंगणवाडीचे बांधकाम या वर्षामध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..