हरभजन सिंग ची राजकारणात एन्ट्री ; आप कडून मोठी ऑफर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंजाबमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबमध्ये बहुमत मिळाल्यामुळे आपच्या भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
विधानसभा निवडणुक प्रचारावेळी सरकार आपलं आलं तर खेळाला प्राधान्य दिलं जाईल, अशी घोषणा भगवंत मान यांनी केली होती. यानंतर आता आम आदमी पक्ष माजी खेळाडू हरभजन सिंगला राज्यसभेत पाठवण्याचा विचार करत आहे. त्याला स्पोर्ट युनिव्हर्सिटीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
महिन्याच्या शेवटी राज्यसभेसाठी आम आदमी पक्षाला पाच जागा मिळणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हरभजनच्या नावाला हिरवा कंदील दिला आहे. यातलं पहिलं नाव हरभजन सिंगचं असू शकतं. लवकरच याची घोषणा व्हायची शक्यता आहे.
पंजाबमध्ये आमचा विजय झाला तेव्हा हरभजन सिंगने ट्विट करून भगवंत मान यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या. आपचं अभिनंदन मुख्यंमंत्री होणाऱ्या माझ्या मित्राला भगवंंत मानला शुभेच्छा, असं टविट केलं होतं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..