मान्सुनपुर्व तयारी आढावा बैठक संपन्न ; आवश्यक कामे 15 मे पुर्वी करण्याच्या सूचना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 मार्च, :- मान्सुनपुर्व करावयाच्या कामांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे, नैसिर्गिक जलाशयांची साफसफाई व नाल्यातील गाळ काढणे तसेच रस्त्यांची डागडूजी पूर्ण करून घेण्याबाबतच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी काल यंत्रणेला दिल्या.
मान्सुनपुर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल घेण्यात आली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी टि.ए.शेख, माता बाल संगोपान अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत मान्सुनपुर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत यंत्रणेला निर्देश देण्यात आले. यात पूर प्रवण गावांचे ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांची साफसफाई करणे, त्यातील गाळ काढणे, नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाची पाहणी करणे आणि गरजेनुसार त्यांचे बळकटीकरण करणे, पडलेले विद्युत खांब दुरूस्ती करून घेणे, रस्ते वाहुन गेले असतील अशा रस्त्यांची डागडूजी पूर्ण करून घेणे इ. सर्व कामे १५ मे २०२२ पुर्वी करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
जेसीबी, क्रेन, गाडी, ट्रक, व्हॅन, मॅन पावर, ईत्यादी उपलब्ध असलेले साहित्य सामुग्री तसेच दुरध्वनी क्रमांक अद्यावत करण्यात यावे, तालुका स्तरावरील नागरी सुरक्षा दल, गृह रक्षक दल, अशासकीय संस्था इ. यांचे समवेत समन्वयन बैठकीचे व प्रशिक्षणाचे आयोजन करणे, पूरप्रवण गावांचे संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचारी यांच्या समवेत तहसीलदार यांनी बैठक आयोजित करणे. विद्युत पुरवठा, दुरध्वनी, रस्ते व पुल इ. अत्यावश्यक सेवा आपत्तीच्या वेळीसुध्दा सुरळीत सुरु राहतील, या हेतूने पुर्व तयारी करणे. जिल्ह्यातील सर्व नागरी भागातील नाली स्वच्छतेची कामे पूर्ण करावी, अतिवृष्टी पुरामुळे कोणत्याही गावाचा संपर्क तुटणार नाही यासाठी उपाययोजना करणे, तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवाण्याबाबत यंत्रणेला सूचना करण्यात आल्या.
बैठकीला जिल्हा टास्क फोर्स समितीचे सदस्य व संबधीत अधिकारी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..