टीईटी गैरव्यवहार प्रकरणी तुकाराम सुपे यांच्यासह १५ जणांवर आरोपपत्र दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक, सनदी अधिकारी सुशील खोडवेकर, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह १५ आरोपींवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले.
सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र तीन हजार ९९५ पानी आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने आणि कागदपत्रांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याचे सायबर पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर, तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, दलाल अंकुश हरकळ, संतोष हरकळ, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, सुनील घोलप, मनोज डोंगरे, सुरजित पाटील, स्वप्नील पाटील, राजेंद्र साळुंके, मुकुंदा सूर्यवंशी यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनदी अधिकारी, शिक्षण परिषदेचे आयुक्त, तांत्रिक सल्लागार, शिकवणीचालक, दलाल आदींचा समावेश आहे. आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत सायबर पोलिसांकडे इलेक्ट्रॉनिक तसेच कागदोपत्री पुरावे आहेत, अशी माहिती सहायक सरकारी वकील अॅगड. विजयसिंह जाधव यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….