देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात लढावं :- प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा चॅलेंज…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदनगर :- वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या निशाण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचं दिसून येत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे असताना देवेंद्र फडणवीस यांची पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे पेन ड्राईव्ह देण्याची कृती नुरा कुस्तीचा प्रकार असल्याचं म्हटलं होते. आज अहमदगनर (Ahmednagar) येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी त्या आरोपाची पुनरावृत्ती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विधान भवनात पेन ड्राईव्ह वरून चालल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह देणे म्हणजे नुरा कुस्तीचा भाग आहे, खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे आंबेडकर म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात उतरुन लढावं. देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचे व्हिडीओ जनतेसमोर आणून ते मैदानी पैलवान आहेत की नुरा कुस्तीतील पैलवान आहेत, हे दाखवून द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया देणार नाही
हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहेय. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. अहमदनगर येथे असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधलाय. कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचा आलेला नाही. त्यामुळे मी माझी प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. तर, कर्नाटक उच्च न्यायालयात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिकेबद्दल माहिती मांडली होती की नाही याबाबत कल्पना नाही. कारण, या प्रकरणात महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या भूमिका महत्त्वाची आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेरपणाचं राजकारण करावं
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण म्हणजे **चे राजकारण असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पंरतु त्यांचा दिलेर पणाही ही दिसला नाही आणि मैदानी पणा ही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली आहे. त्या प्रकाराला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर चे राजकरण केले, असं म्हणतातस अशी टीका आंबेडकर यांनी केली होती. फडणवीस यांना दिलेरपणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टेप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे होती, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..