“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा” ; मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांची मोठी मागणी ; राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली 15 मार्च :- महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी एक नवा ट्विस्ट देणारी एक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमधील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबतची आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून मागणी करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी थेट अशाप्रकारची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? “महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गैरसमज आहे की भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आहे. सरकार ईडीला सांगून आमच्यावर कारण नसताना कारवाई करायला लावत आहे, अशी त्यांची तक्रार आणि भावना आहे. पण ईडीसोबत आमचा काही संबंध नाही, संबंधित यंत्रणा केंद्राच्या अंतर्गत असली तरी त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. त्यांना तपासाबाबतचं स्वातंत्र्य आहे.
ईडी ज्यांचा तपास करत आहेत ते किंवा ज्यांच्याविरोधात कारवाई करत आहे ते चुकीचं असेल तर त्यांनी कोर्टात जायला हवं. तसेच त्यांनी त्याबाबतचा पुरावा ईडीला द्यायला हवा”, असं रामदास आठवले म्हणाले. (ऑफिसमध्ये मोबाईल वापरताय? जरा जपून, नाहीतर नोकरीला मुकाल, कारण….) “भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत.
त्यांनी अनेक जे महाघोटाळा झाले आहेत त्याची चित्रफित विधानसभेत दाखवली. त्यामुळे सरकारची बदनामी होतेय. केंद्र ईडीच्या माध्यमातून आमची चौकशी करतेय या भावनेतून देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांच्या नोटीसीतून त्रास द्यायचा. त्यांची पोलिसांकडून चौकशी करणं हे अतिशय अयोग्य आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड करत असतात. कधी त्यांची पोलीस चौकशी केली का? अनेकवेळा राफेलच्या करारावरुन भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आम्ही कधी त्यांची चौकशी केली का?
त्यामुळे माझे महाविकास आघाडीच्या सरकारला विचारणं आहे की, तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर अन्याय का करत आहात? तुमच्याकडे माहिती असेल तर त्यांची चौकशी करु शकतात. पण त्यांनी तुमच्याविरोधात भूमिका मांडली म्हणून पोलीस नोटीस देता हे बरोबर नाही. हे अतिशय अन्यायकारक असं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार अशाच पद्धतीने वागत असेल तर याच दिशेला पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मी अमित शाह यांना भेटणार आहे. मी त्यांना पत्र लिहिणार आहे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालीच पाहिजे, अशी मागणी करणार”, अशी भूमिका आठवलेंनी मांडली. आठवलेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर दरम्यान, काँग्रसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रामदास आठवले यांचं वक्तव्य गांभीर्याने न घेण्याती प्रतिक्रिया दिली आहे. आठवले गो कोरोना गो म्हणाले, पण तितकं सोप ते नव्हतं. गो कोरोना गो म्हटल्याने कोरोना गेला नाही. तसंच त्यांनी म्हटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, असं प्रत्युत्तर अतुल लोंढे यांनी दिलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..