“पराभवासाठी गांधी कुटुंब जवाबदार नाही” :- मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आणि भाजपला मात देण्याकरता नवी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१३ मार्च) रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधी (Soniya Gandhi) काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय या एकमताने घेण्यात आला. दरम्यान, या पराभवासाठी गांधी कुटुंब जबाबदार नाही, असे वक्तव्य पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,’आम्ही सर्वांनी सोनिया गांधींना सांगितले की या पराभवाला त्या एकट्या एकट्या जबाबदार नाही. यासाठी गांधी कुटुंब नाही तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे खरगे म्हणाले.
दरम्यान, या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, जर काही लोकांना असे वाटत असेल की या परिस्थितीला गांधी कुटुंब जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, तर आम्ही पक्षासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही पद सोडायला तयार आहोत. मात्र, सोनिया गांधींचा हा प्रस्ताव सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी लगेच फेटाळून लावला.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..