महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांवर साधला निशाणा , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. आज त्यांची चौकशी करण्यात आली आहे.त्यामुळे राजकीय वातावरण तापले असुन देवेंद्र फडवणीस यांच्या चौकशीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना प्रश्नांसाठी बोलावण्यात आले नव्हते, तर काही प्रश्नांची उत्तरे पाठवण्यात आली होती.”
ते पुढे म्हणाले की, “आज पोलिस दलाचे एक पथक त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) घरी पाठवण्यात आले कारण, त्यांनी संबंधित प्रकरणाबाबत पाठवलेल्या प्रश्नांना उत्तर दिले नाही.”
मुंबई सायबर पोलिसांच्या पथकाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडले. निवेदन नोंदवल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
ट्रान्स्फर पोस्टिंग प्रकरणात पोलिसांच्या टीमने माझे जबाब नोंदवले आहेत, मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार हे प्रकरण दडपून बसले होते. मी या प्रकरणाचा व्हिसलब्लोअर आहे.
तसेच मी राज्य हस्तांतरण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांकडे सादर केली आहेत. त्यांनी असेही म्हटले असले तरी मी ती कागदपत्रे मीडियासोबत शेअर केलेली नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहसचिवांना भेटून पोलीस बदलीशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांना सुपूर्द केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सीक्रेट अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच प्रकरणात सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटने फडणवीस यांना दोन ते तीन नोटिसा बजावल्या होत्या. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?