ती क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती :- प्रकाश आंबेडकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. फडणवीसांनी विधिमंडळात सादर केलेली ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती, असे ते म्हणाले.
अॅड. प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात बोलत होते. ते म्हणाले, ‘मी फडणवीसांना मैदानी खेळाडू व दिलेर समजत होतो. पण त्यांचा दिलेरपणा आणि खेळाडूवृत्ती दिसली नाही. ‘ती’ क्लिप त्यांनी सभापतींना सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत खालच्या दर्जा (अश्लील भाषेत)चे राजकारण म्हणतात.’ राजकारण करायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. फडणवीसांनी लोकांपुढे ‘ती’ क्लिप आणली असती तर पोलिसांनी नोटीस देखील दिली नसती, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खालच्या भाषेत देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….