कॉंग्रेसचं ठरलं ; अध्यक्षपदासाठी गांधी परिवाराबाहेरील “या” नेत्यांच्या नावाची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्यानंतर आता काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
यामध्ये गांधी परिवाराकडून काँग्रेस अध्यक्षपद इतरांकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चाही होती. त्याला आता काँग्रेसच्याच काही नेत्यांकडून दुजोरा मिळाला आहे. कारण G23 सदस्यांनी मुकुल वासनिक यांच्या नावाची काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिफारिस केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं पत्रकारांनी म्हटलं आहे.
पाच राज्यांमधील लाजीरवाण्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर या चर्चेला अधिक जोर आला होता. या साऱ्या प्रकारानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काही तासांपूर्वी ट्विट करत यावर खुलासा केला होता.
सुरजेवाला यांनी म्हटलं होतं की, “काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. एखाद्या टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काल्पनिक स्रोतांच्या आधारे अशाप्रकारच्या अप्रमाणित प्रचारकी बातम्या प्रसारित करणे अयोग्य आहे”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..