पोलिसांनी अचानक प्लान बदलला ; जवाब नोंदविण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस जाणार कायदा व सुव्यवस्थे राखण्यासाठी निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान या संबंधी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलावले होते. मात्र दुसरीकडे भाजपने या विरोधात आंदोलनाची तयारी केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती स्वतः फडणवीसांनी ट्विट करून दिली आहे.

आता फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपने बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. दरम्यान गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणात आता फडणवीसांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..