पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआय ला दिले नाही तर न्यायालयात जाणार :- फडणवीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी मंत्री गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याच्या कटाचा तपास हा सरकारने सीबीआयला दिला नाहीतर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात व्हिडिओ (Video) पुराव्यांसह पेनड्राईव्ह देऊन सरकार विरोधकांना संपवन्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यात माजी मंत्री गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याचा कट रचत असल्याचा म्हटलं होते. याचे पुरावे फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह मधून अध्यक्षांना दिले होते.
प्रवीण चव्हाण हे वकील आहेत तसे मीही वकील आहे. प्रविण चव्हाण यांच्या व्हिडिओ बाबत मी फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवला आहे. मागचे तीन दिवस चव्हाण का बोलले नाहीत. ते सरकारशी बोलून उत्तरे देत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे प्रकरण सरकारने सीबीआय (CBI) ला दिले नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत. सरकारमध्ये घबराहट आहे. कॅमेरावर तारीख अगोदरची आहे हे लॉजिक सरकार करत आहे. यांना चौकशी करायची असेल तर सरकारी वकील विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे कसे बोलू शकतात याची चौकशी व्हायला हवी, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. या प्रकरणाचे अन्य पुरावेही माझ्याकडे आहेत. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..