“मंत्री पदाची पर्वा नाही , उद्याच राजीनामा देतो” :- राज्यमंत्री बच्चू कडू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या आठ दिवसापासून प्राणंतीक उपोषण करत आहे. रात्री भरपावसात या उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या उपोषणाला भेट दिली.
आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही इथं माझ्या राजीनामासाठी बसले की न्यायासाठी, हे बरोबर नाही तुमची इच्छा असेल तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो त्यांची काही पर्वा नाही, असं बच्चू कडू म्हणाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात १६ तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून यात या उपोषणावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..