“भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसींचे योगदान त्यांना भारतरत्न द्यावा लागणार”, राऊतांचा टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला धक्का लावून गेला आहे. भाजपने बहुमत मिळवत ३०० च्या आसपास टप्पा गाठत आपली ताकत दाखवून दिली आहे. राम मंदिर, शेतकरी आंदोलन असे विविध मुद्दे असताना भाजपने सर्वाधिक जागा जिंकत विरोधी पक्षाला दम भरवला आहे.
कॉंग्रेस आणि मायावतींचा बहुजन पक्ष यांना अतिशय निराशादायक निकाल लाभला आहे. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“भाजपला मोठा विजय मिळाला आहे. यूपी त्यांचे राज्य होते पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती (Mayawati) आणि ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचे योगदान आहे. या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागणार आहेत. आम्ही आनंदी आहोत. विजय आणि पराभव आहेत. तुमच्या आनंदात आम्हीही आहोत.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान उत्तर प्रदेशातील निकालावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार १८० चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….