“द कपिल शर्मा शो” मध्ये दिसणार नाहीत नवज्योत सिंह सिद्धू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना सगळीकडूनच हार पत्करावी लागत आहे. पंजाब विधानसभा निवडणूकांमध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांना हार पत्करावी लागली आहे. सिद्धू यांनी पक्ष बदलला, शक्य ते सर्व प्रयत्न केले पण मुख्यमंत्री पद त्यांना मिळू शकलेलं नाही.
या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. एवढंच नाही तर त्यांचं राजकीय कारकिर्दही संपल्यानं ते लवकरच कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा दिसणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर शोच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत सिद्धू या शोमध्ये पुन्हा दिसणार नसल्याचं म्हटलं आहे.
एकीकडे निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि दुसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनीही आपला निकाल सांगितला आहे. यावरून आता सिद्धू यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तर मिळू शकली नाहीच पण त्यांनी कपिल शर्मा शोची खुर्ची देखील गमावली असं बोललं जात आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांच्याबाबत निर्माते अशोक पंडित यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे.
अशोक पंडित यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘ज्या लोकांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याविषयीची चिंता आहे. त्यांना मी सांगू इच्छितो. Federation Of Western India Cine Employees ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं नॉन को- ऑपरेशन जारी केलं आहे. याचा सरळ अर्थ आहे की ते ‘कपिल शर्मा शो’मध्ये वापसी करू शकत नाहीत.’

अशोक पंडित यांच्या या ट्वीटनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांचे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ‘द कपिल शर्मा’ शो देखील सतत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोच्या मेकर्सनी नकार दिल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केल्यानंतर हा शो चर्चेत आला होता. ज्यामुळे शो बंद करावा अशी मागणीही सोशल मीडियावर होताना दिसली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….