उ.प्र. निवडणुक ; भाजप पुन्हा सत्तेत आल्याने सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कानपूर :- उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. कानपूरमधून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह ऊर्फ पिंटू हेही पराभूत झाले.
पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी गुरुवारी विधानभवनासमोर आत्मदहनाचा (self-immolation) प्रयत्न केला. रुग्णालयात जाताना ते ओरडत होते की ‘भाजपने पुन्हा सरकार स्थापन केल्याने मला दु:ख झाले आहे.’ असे पोलिसांनी सांगितले.
नरेंद्र सिंह ऊर्फ पिंटू यांनी आत्मदहनासाठी स्वतःला आग लावली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ४० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेंद्र हे कानपूरमध्ये समाजवादी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.
कानपूर नगरचे वरिष्ठ सपा नेते नरेंद्र सिंह ऊर्फ पिंटू चार वाजताच्या सुमारास विधान भवनासमोर पोहोचले. अचानक त्यांनी स्वतःवर तेल ओतले. त्यानंतर आग (self-immolation) लावली. यावेळी पोलिसांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. पोलिसांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे, असे एसीपी हजरतगंज अखिलेश सिंह यांनी सांगितले.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
विधानसभा निवडणुकीची (assembly election) मतमोजणी गुरुवारी होत होती. यादरम्यान भाजपचे पुन्हा सरकार स्थापनेचे ट्रेंड येऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी भाजप (BJP) कार्यालय आणि विधानभवनाभोवती बंदोबस्त वाढवला होता. त्याचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांच्या उपस्थितीत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..