लोकशाही दिनातील तक्रारींचे समाधानकारक अनुपालन व्हावे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे ; लोकशाही दिनात 137 तक्रारी प्राप्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 07 मार्च, :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 137 तक्रारी प्राप्त झाल्या. लोकशाही दिन प्रसंगी अधिकाऱ्यांची उपस्थिती केवळ आढावा घेण्यासाठी नसून प्रत्येक अधिकाऱ्यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर सात दिवसात कार्यवाही करून समाधानकारक अनुपालन करावे. तसेच प्रलंबित तक्रार अर्जांवर दोन महिन्यात कार्यवाही न झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्याची दखल घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज लोकशाही दिनप्रसंगी अधिकाऱ्यांना दिला.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..