वेळ तीच , ठिकाण ही तेच ; संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार…? तात्काळ करणार पत्रकार परिषदेचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.
उद्या दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवर दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊत कुणाचा आणि कोणता घोटाळा बाहेर काढणार? नेमकी कोणती माहिती समोर आणणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

संजय राऊत यांनी याआधीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हटलं होतं. याच शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडीचा सर्वात मोठा घोटाळा सर्वांसमोर उघड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता संजय राऊत थेट ईडीबाब नेमके कोणते गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
“ईडीच्या चौकशांची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचं हे किरीट सोमय्या सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहे आणि आम्ही आरोप सुरू केले तर एक दिवस असा नक्कीच येणार आहे की तुम्हाला या महाराष्ट्रातून तोंड काळ करून जावं लागेल”, असं संजय राऊत म्हणाले होते.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….