कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी मिळणार मदत ; महिला व बाल विकास विभागाद्वारे जिल्ह्यास बाल न्याय निधी उपलब्ध ; मदतीसाठी पात्र गरजूंनी अर्ज करण्याचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 03 मार्च :- कोविड आजारामुळे अनेकांना आपले जवळचे व्यक्ती गमावावे लागले असून जिल्ह्यातील 479 बालकांनी आपले आई किंवा वडील कोविड मुळे गमावले आहेत. यातील 12 बालके असे आहेत कि ज्यांनी आई- वडील दोन्ही कोविडमुळे गमावले आहे. कोविडमुळे पालक गमावलेल्या 18 वर्षाआतील बालकांना सहाय्य म्हणून शासनाद्वारे विविध योजनांचा लाभ दिल्या जात आहे.
याचाच एक भाग म्हणून या बालकांच्या मदतीसाठी महिला व बाल विकास विभागाद्वारे बाल न्याय निधी जिल्ह्यास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अंतर्गत शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करीता आर्थिक मदत केल्या जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीकडे तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांच्या कडे विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.
जिल्हा कृती दल मार्फत अर्जाची तपासणी करून गरजू बालकांना लाभ दिल्या जाणार आहे. बाल न्याय निधी द्वारे कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांना शैक्षणिक शुल्क व शैक्षणिक साहित्य साठी मदत केल्या जाणार आहे. त्यामुळे गरजू बालकांनी त्वरित अर्ज दाखल करावे व अधिक माहिती करीता जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक- यवतमाळ येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..