संभाजीराजे सोपं नाही , शब्द देणार्यांच्या शर्ट पकडा :- चंद्रकांत पाटील यांची सल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- ‘मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने जुन्याच मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकारने तारखा दिल्या आहेत.
त्याची अंमलबजावणी झाली नाही तर खासदार संभाजीराजेंनी त्या त्या तारखेला शब्द देणाऱ्यांचा शर्ट पकडावा,’ असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
संभाजीराजेंनी ज्या मागण्या आता केल्या होत्या, त्या कोणतीही खळखळ न करता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या होत्या. दोन वर्षे सलग ६५०- ६५० कोटी रुपयांचा निधी दिला होता; परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच या मंजूर केलेल्या योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे संभाजीराजे उपोषणास बसले.
महाविकास आघाडी सरकारने नव्याने काही केलेले नाही, जुन्या बंद झालेल्या योजनांना नव्याने मंजुरी दिली एवढेच आहे. तरीही राजे हे तितकं सोपं नाही. तुम्हाला ज्या तारखा दिल्या आहेत, त्या तारखेपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर शब्द देणाऱ्यांचे शर्ट पकडा, असे पाटील म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी, आमचा या आंदोलनास पाठिंबा राहील. प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकाच वेळी राज्यात एक हजार आंदोलने केली आहेत.
राज्यपालांच्या वक्तव्यावर मात्र गप्प…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांनी यावर खुलासा केला असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. राज्यपाल जुना इतिहास वाचणारे आहेत, असे पाटील यांनी सांगितले

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”